सुधीर यादवराव चौधरी, यादवराव चौधरी, सुरेखा सुधीर चौधरी आणि मंदा महाजन हे अपघातातून बचावले आहे. यादवराव सेवानिवृत्तआहेत. त्यांचे कुटुंब मूळचे चंद्रपूर येथील आहे. १९९४ मध्ये सुधीरचा विवाह नागपुरातील सुरेखा हिच्याशी झाला. त्यांना वेदांत (१०) आणि अंकुश हीदोन मुले आहेत. आठ वर्षांपासून सुधीर कुटुंबासह नागपुरातच वास्तव्यास आहे.
बुधवारी महालक्ष्मीनिमित्त ते नातेवाईकाकडे जेवणासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा घरी परतले. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरेखाचीमावशी मंदा महाजन आल्या होत्या. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरेखा मुलगा अंकुशला कडेवर घेऊन मावशी मंदा यांच्यासोबतविहिरीच्या काठाजवळ गप्पा करीत उभी होती. त्या वेळी अचानक भूस्खलन झाले आणि संपूर्ण विहिरीसोबतच उभे असलेलेही जमिनीखाली दबलेगेले. काहीतरी पडण्याचा आवाज आल्यावर घरात बसलेले यादवराव आणि सुधीर बाहेर निघाले. सुधीरने पत्नी, मुलगा आणि मावशीला जमिनीतूनखेचून बाहेर काढले. मात्र, सुरेखाच्या हातातून मुलगा सुटला. सुधीर व यादवराव यांनी विहिरीत उडी घेऊन सुधीरचा शोध घेतला पण तो सापडलानाही.
वाचा -अमेरिकी महिलेच्या कॅमेऱ्याने जगापुढे आणली कामाठीपुराची वस्तुस्थिती,अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा
दरम्यान, विहिरीतून बाहेर निघताना सुधीर व यादवराव यांच्यावरही माती पडली. त्यावेळी शेजारच्या लोकांनी दोरखंडाच्या सहाय्यानेत्यांना ओढले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन पथकही दाखल झाले. त्यांनी जेसीबीने विहिरीतील माती काढली. दुपारी २वाजता अंकुशचा मृतदेह सापडला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.