HW News Marathi
मुंबई

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

मुंबई | पेट्रोल आणि डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले .
मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या पेट्रोलियम हाऊस येथे आज दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते जमा झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत सरकारचा निषेध केला .
वाहरे सरकार तेरा खेल सस्ती दारू मेहंगा तेल …. सध्याच्या परिस्थितीत महागाई प्रचंड वाढत असताना सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात अच्छे दिन येण्याच्या ऐवजी महागाई मुळे बुरे दिन सुरू झाले असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वाह रे सरकार तेरा खेल … सस्ती दारू मेहंगा तेल आशा घोषणा देत सरकारचा निषेध केला .
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज मंगळवार दि 3 एप्रिल रोजी, दुपारी 3.30 वाजता, पेट्रोलियम हाउस, महात्मा गांधी पुतळ्याच्या मागे, मंत्रालय, मुंबई येथे ही निदर्शने करण्यात आली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

News Desk

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी, पालिका हतबल

News Desk