HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१ मार्च) कोरोनाची लस टोचून घेतली आहे. आज ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या होत्या. यावेळी शरद पवारांनी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेली कोविशिल्ड ही लस घेतली आहे. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जात आहे. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखांच्या पार, गेल्या २४ तासात २८,४९८ नवे रुग्ण

News Desk

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

News Desk