मुंबई | स्वातंत्रवीर सावरकर यांच्या दादर स्थित राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी गुढी पाडव्या निमित्त नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही स्मारकाच्या वतीने दादर मध्ये नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत यात्रेत स्मारकाचे कर्मचारी विभागातील बच्चे कंपनी तसेच सावरकर प्रेमी सहभागी झाले होते. दादरकरांचा या स्वागत यात्रेत यावेळी विशेष सहभाग पहायला मिळाला. गतवर्षी भारत माता ही थीम घेऊन ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती.
यंदा च्या स्वागत यात्रेत वर्षभर देशात सुरू असलेला जातीवाद नष्ट होऊन सावरकरांच्या स्वप्नातले सर्व धर्म समभाव असलेल्या असलेले राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी सर्व धर्म समभाव असलेली थीम घेऊन स्वागत यात्रा काढण्यात आली. राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र यावे यासाठी सावरकरांनी नेहमी प्रयत्न केले. त्यामुळे दरवर्षी स्मारकाकडून विशेष थीम घेऊन ही नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते.
या स्वागत यात्रेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दादर मधील अनेक छोट्या मोठ्या मंडळांच्या रॅली या स्वागत यात्रेत एकत्र होतात आणि सावरकर स्मारकापासून सुरू झालेली ही स्वागत यात्रा संपूर्ण दादरमध्ये फिरविण्यात येते. यामध्ये पारंपरिक वेशात अनेक दादरकर देखील दरवर्षी सहभागी होतात.
जातीच्या नावावर सुरू असलेला गोंधळ हे चित्र बदलून सर्वांनी एकत्र येऊन देशाची प्रगती उन्नती साधने गरजेचे नाही. देशातील लोकांनी आरक्षण आणि जातीपातीत अडकून न रहाता देशासाठी एकत्र येऊन काम करणे गजेचे आहे. यासाठी सर्व धर्म समभाव ही थीम घेऊन यंदाचा चित्ररथ आणि नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली असल्याचे यावेळी सावरकर स्मारकाचे सह कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.