HW News Marathi
मुंबई

मालवणी येथे 152 ग्रॅम कोकेनसह नायझेरियन तस्करांना अटक

मुंबई | मालाडच्या मालवणी येथील राठोडी गावातील पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून नायझेरियन तस्करांवर साध्या वेशात नजर ठेवून होते. यावेळी चुकवू फिलिप्स गॉडवीन(33), चुकावे मेका डेनियल अजाह (24) आणि मायकल ओगवन्ना कौसी (22) हे तीन नायझेरियन तरुण त्या परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते. त्यांच्यावर संशय येऊन जेव्हा पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले तेव्हा पोलिसांना तब्बल 15 लाख २० हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम कोकेन सापडले आहे.

हे नायझेरियन तस्कर मालाडच्या मालवणी परिसरात येणार असल्याची माहिती मालवणीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक फटांगरे यांना आधीच मिळाली होती. फोनवरून संपर्क साधून हे तस्कर अंमली पदार्थ घेण्यासाठी बोलवत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या आधी काही तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने या नायझेरियन तस्करांचे अटकसत्र सुरू केले आहे.

मागील पाच महिन्यांत मालवणी पोलिसांनी एकूण 11 परदेशी तस्करांना अटक केली आहे. तसेच शहरातील उचभ्रू कुटुंबातील तरुण मुले या व्यसनाला सर्वाधिक बळी पडत असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मालवणी पोलिसांकडून केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

News Desk

विमानतळ नामकरणाचा वाद, सेनेने थोपटले दंड

News Desk

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk
राजकारण

राम कदम दोषी आढळल्यास कारवाई करू | विनोद तावडे

News Desk

मुंबई | “उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन” असे चुकीचे वक्तव्य राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेले आहे. यावर मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. असे वक्तव्य विनोद तावडे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांनी आज बुधवारी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा घेराव घालून जाब विचारला. त्यांना उत्तर देताना तावडे म्हणाले की, ‘प्रसार माध्यमांवर जी राम कदम यांची क्लिप दाखवली जाते, तसे वकव्य करणे चुकीचेच आहे. जर यामध्ये ते दोषी आढल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.’

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या उत्सवात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.’आम्ही जिजाऊच्या लेकी, पळवुन दाखवा, राम कदमांचा चौरंग करु’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

Related posts

मध्य प्रदेश-मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ची हाफ सेंच्युरी

News Desk

एक घोट समाधानाचा

News Desk