HW News Marathi
मुंबई

कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

मुंबई | शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे जलदगतीने पूर्ण करण्यात यावे तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना आणखी वेग देण्यात यावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी काल (२२ जुलै) दिले.पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांची आढावा बैठक मुंबई येथे मंत्रालयात झाली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते.

यावेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सुरळीत वीजपुरवठा व वीजबिलांच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे प्रादेशिक विभागात सुरु असलेल्या विविध योजनांची प्रभावी व वेगवान अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कंत्राटदारांकडून सुरु असलेली कामे व त्याचा दर्जा याचे पर्यवेक्षण करण्यात यावे असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासाठी मुबलक प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच वीजबिलासंबंधीच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांचे समाधान करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या व निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध त्वरीत कारवाई करावी. सौर कृषिपंप योजना व सध्या चालू असलेल्या इतर योजनांमध्ये प्रतीक्षा यादीप्रमाणे कृषी ग्राहकांना जोडण्या देण्यात याव्यात.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांना जोडणी देण्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी निवड होऊ शकली नाही त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्त करून घ्यावी. साडेसात एचपी क्षमतेसाठी सौर कृषिपंपांची योजना तपासून पाहण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. पुणे प्रादेशिक विभागात वीजहानीचे प्रमाण कमी करून महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना करावी. रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी करणे आदींसोबत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका, जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

News Desk

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

News Desk