HW News Marathi
मुंबई

पालिका नव्हे यंदा गणेश मंडळेच बुजविणार खड्डे

मुंबई : गणेश उत्सावाच्या तोंडावर राज्यभरातील पालिकांकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पळापळ होते. तरीही गणेश आगमन किंवा अगदी विसर्जनापर्यंतही खड्डे नाहीसे होण्याची शाश्वती नसते. त्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनीच खड्डे बुजविण्यात पुढाकार घेतला आहे. राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्याअभिनव संकल्पनेतून यंदा ‘खड्डे बुजवा, जीव वाचवा’ संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्धार गणेश मंडळांनी केला आहे.

राज्य धर्मादाय आयुक्त म्हणून डिगे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत ही संकल्पाना मांडली. या वेळी अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्यासह गणेश गल्ली, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव, जी.एस.बी सेवा मंडळ, गणेशोत्सव समन्वय समिती आदींचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रभरात सुमारे लाखभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून या सर्व मंडळांना एका व्यासपीठावर आणून उत्सव अधिक समाजाभिमुख करणे आणि गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासावर हायकोर्ट नाराज

swarit

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान जी २० विकास कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन

Aprna