HW News Marathi
मुंबई

भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’, दिग्गज नेत्यांचा सहभाग

मुंबई आज मुंबईत आयोजीत सर्वपक्षीय संविधान बचाओ रॅलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. भाई जगताप, माजी खा. नाना पटोले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी दुपारी रॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातून आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत वर्तमान परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून या रॅलीचा समारोप झाला.
आज राज्यातील सर्व जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाने संविधान बचाओ रॅली काढल्या होत्या. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या संविधान बचाओ रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk

सामराज हाॅटेलला आग लागली

News Desk

दाऊदच्या हॉटेलच्या जागी शौचालय

News Desk