HW News Marathi
मुंबई

Dahi Handi | दादरमध्ये गोविंदांच्या स्वागताला आयोजक सज्ज

मुंबई | आला…रे..गोविंदा..आला गोपाळकाला म्हटले की संपुर्ण देशाचे लक्ष लागते ते मुंबईच्या दहीहंहीकडे आज गोपाळकाला हा सण मुंबईकरांसाठी खास मानला जातो. गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात. यंदा शासनाने प्रो-दहीहंडीला मान्यता दिली आहे. सालाबादप्रमाणे यंदा दादर येथील आयडियल, दादर स्टेशनजवळील आणि नक्षत्र मोलसमोरील दहीहंडी ही खास असते. या दहीदंडी फोडण्यासाठी येथे गोविंदा पथक देखील दाखल झाले आहेत.

(छायाचित्र – गौरी टिळेकर )

यंदा आयडियलची इकोफ्रेंडली दहीदंडी असून श्री साई दत्त मित्र मंडळ आणि आयडियल यांच्या संयुक्तविद्यामाने, दादर स्टेशनजवळील दहीहंडी ही भाजपचे माहिम-वडाळा विधानसभा वॉर्ड – १९२ वॉर्डचे अध्यक्ष मनोड शाहा आणि माहिम विधानसभाचे अध्यक्ष विलास आंबेकर यांनी आयजित केली. तर नक्षत्र मोलसमोरील दहीहंडी ही शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश बबन पाटनकर यांनी आयोजित केली आहे.

दादर येथील दहीदंही फोडण्यासाठी मुंबईतील ठिकठिकानाहून गोविंदा पथक येथे येता. हळूहळू दहीहंडीचा उत्साह संपुर्ण मुंबईत पाहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्गाने लादलेल्या अंधत्वावर मात करत फोडली दहीहंडी

News Desk

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

News Desk