HW News Marathi
मुंबई

चैत्यभूमी येथे कायमस्वरूपी भिमज्योती

मुंबई | राज्य सरकारने हुतात्मा चौक, मुंबई येथे कायमस्वरूपी तेवत असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या ज्योतीच्या धर्तीवर दादर चैत्यभूमी येथे कायमस्वरूपी भिमज्योत उभारण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले मान्यता दिली आहे, अशी माहिती रमेश जगताप यांनी दिली. नायगाव-वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी चैत्यभूमीत भिमज्योत उभारण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

भिमज्योत कोणत्या जागी उभारावी यासाठी मंत्री राजकुमार बडोले, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव (नगर विकास), प्रधान सचिव (पर्यावरण विभाग), सचिव (सामाजिक न्याय), उपायुक्त (पालिका) आदी अधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांना सामाजिक न्यायमंत्र्यांकडून निर्देशही देण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या पावसाळ्यात रेल्वेच्या ३४८ फे-या होणार रद्द

News Desk

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

News Desk

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

swarit