HW News Marathi
मुंबई

आरे कॉलनीतील मेट्रो ३ च्या कारशेडला हिरवा कंदील

मुंबई | राष्ट्रीय हरित लवादाने आरे कॉलनीतील मेट्रो ३ च्या कारशेडला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मेट्रो-३ कारशेडच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. आरे कॉलनीत मेट्रो ३ साठी कारशेड उभारण्याविरोधात वनशक्ती संस्थेकडून राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीत काल (गुरुवारी) झालेल्या अंतिम सुनावणीत वनशक्ती संस्थेला अर्ज मागे घ्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर वनशक्ती आपला अर्ज मागे घेतला आहे.

मुंबईतील बहुप्रलंबित कुलाबा -बांद्रा- सिप्झ या दरम्यानचा मेट्रो-३ मार्ग हा ३३.५ किमी लांबीचा असणार आहे. या मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्याची योजना आखण्यात आली होती. आरे कॉलनीत मेट्रोच्या कारशेडमुळे तेथील हिरवीगार वनराई नष्ट होईल म्हणून पर्यावरणवाद्यांकडून वारंवार विरोध दर्शविण्यात येत होता. १४ मे २०१८ रोजी राष्ट्रीय हरित लवादाने ‘अंतिम आदेश होईपर्यंत सदर जागेत डेब्रिज टाकणे, भराव टाकणे आणि वृक्षतोड करण्यास तात्पुरती बंदी असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशला स्पष्ट केले होते. ही बंदीदेखील आता उठविण्यात आली आहे.

जलद गतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडबाबतीत सर्व अडचणी दूर झाल्याने आता आरेमध्ये जलद गतीने काम करून हा प्रकल्प सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.

आता पर्यावरणवाद्यांची सर्व भिस्त सर्वोच्च न्यायालयावर

या संदर्भात पर्यावरणवाद्यांकडे आता सर्वोच्च न्यायालय हाच अंतिम पर्याय उपलब्ध आहे. आता आम्ही ही लढाई सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार असून आरेमध्ये मेट्रोने झाडे कापण्यास सुरुवात केली तर आम्ही बांधकाम परिसरात आंदोलन करू असेवनशक्तीचे प्रकल्प संचालक डी स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पर्यावरणवाद्यांची सर्व भिस्त सर्वोच्च न्यायालयावर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 पाचशे वर्षापूर्वीच्या तंत्रज्ञानाद्वारे नाक रोपन

News Desk

भीमा कोरेगाव :… अटक सत्र जाहिर निषेध- सचिन सावंत

News Desk

मुंबईच्या समुद्रात दररोज मिसळते लाखो लिटर सांडपाणी

News Desk