HW News Marathi
मुंबई

मुंबईत पेट्रोल दराने नव्वदी गाठली…

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि वाढवलेले कर यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईची झळ बसताना पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. सोमवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असूनस सध्या पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल ७ पैशांनी महागले आहे.

महिन्याभरापासून पेट्रोल डिझेलचे दर कमालीचे वाढलेले पहायला मिळत आहेत. सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पेट्रोल ८०.११ तर ६६.८५ रुपयांना मिळत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यात पेट्रोल ९.२७ आणि डिझेल ११.५० रुपयांनी वाढले आहे. आज पेट्रोलचा मुंबईमध्ये दर ८९.४४ तर डिझेलचा दर ७८.३३ रुपये प्रती लिटर आहे. तर दिल्ली मध्ये पेट्रोल ८२.०६ आणि डिझेल ७३.७८ रुपये आहे. दिल्लीमध्ये डिझेल दर ६ पैशांनी वाढला आहे.

जनता महागाई ने पिळवटून निघाली असताना केंद्रीय मंत्र्यांची वक्तव्ये त्यांचा जखमांवर मीठ चोळणारी आहेत. रामदास आठवले यांनी आपल्याला मोफत असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा काही फरक पडत नसल्याचे बेताल वक्तव्य केले होते. परंतु सर्व बाजूंनी या वक्तव्यावर टिका होत असताना रामदास आठवले यांनी माफी मागितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईवर ‘अस्मानी’ संकट,खासगी आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर

News Desk

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat