HW News Marathi
मुंबई

पेट्रोल ४ रुपयांनी होणार स्वस्त

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. गेले काही दिवस देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने सुद्धा हे दर वाढतच राहणार असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत नसली तरी सामान्य मुंबईकरांना एक दिवस का होईना थोडा दिलासा देणार आहे. त्यामुळे तरुणांमध्ये या घोषणेची चर्चा रंगली आहे. सत्ताधारी देऊ शकत नसले तरी, मनसेने एक दिवस का होईना पण मुंबईकरांना जर पेट्रोल दरवाढीत सवलत दिली तर भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मनसेने फक्त टीकाच केली नाही तर १ दिवस का होईना पण पेट्रोल दरात ४ रुपये एवढी मोठी सवलत दिली जाणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव च्या दंगलीचे डोंबिवलीत पडसाद

News Desk

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk