HW News Marathi
मुंबई

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

मुंबई | सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ आणि वाइल्डलाईफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या निसर्ग आणि वन्यजीव यांच्या छायाचित्राचे “निसर्गाशी नाती जुळवा” प्रदर्शन भारतातील प्रतिष्ठित अशा मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दिनांक १० ते १६ ऑक्टोबर या सात दिवसात सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. या प्रदर्शनात डॉ. व्यंकटेश मेतन यांनी टिपलेली ९० छायाचित्रे प्रदर्शित होणार आहेत.

सोलापूरमधून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा प्रथम बहुमान डॉ. मेतन यांना मिळाला आहे. या प्रदर्शनात सोलापुरातील वन्यजीवनाचे छायाचित्रे ठळकपणे मांडली जाणार आहे. तसेच सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे. हा संदेश देण्यात येणार आहे. यामुळे भारतातील अनेक वाइल्डलाईफ फोटोग्राफर सोलापूरला भेट देतील. या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश नागरिकांमद्धे आणि युवकांमद्दे निसर्गाबद्दल जागरूकता, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल आवड आणि रुची निर्माण करणे, छायाचित्रिकरण या मध्ये रुची निर्माण करणे, आपल्या पृथ्वी मातेचे सरंक्षण आणि सर्व जनतेला निसर्गाशी नाते जुळवण्यास प्रवृत्त करणे आहेत.

आपण मागील काही वर्षामध्ये निसर्गामध्ये अनेक बदल होताना पाहतो. तसेच निसर्गातील समतोल झपाट्याने ढळत चाललाय. याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही महत्वाचे कारणे म्हणजे मानवाचे झपाट्याने जंगलावरील, नदीवरील, समुद्रावरील आणि तलावावरील होणारे अतिक्रमण, मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल, बेकायदेशीर होणारी पक्षी आणि प्राण्यांची हत्या, मोठ्या प्रमाणात होणारी मासेमारी, हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, पक्षी आणि प्राण्यांचे नैसर्गिक आवास क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप आणि कीटकनाशकांचा वापर अशी आहेत.

यावर मात करण्यासाठी अनेक उपाय आणि योजना आहेत, त्यामद्धे सर्वात महत्वाचा उपाय, जनतेंमद्धे निसर्गाबद्दल, वन्यजीवांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करुन त्याबद्दल रुची निर्माण करणे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे हि प्रत्येक नागरिकाची, सरकारची, वन विभागाची, सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. जर प्रत्येकाने सांघिक काम केले तर नक्की निसर्गामध्ये समतोल राहील.

कोण आहेत डॉ. मेतन ?

डॉ. मेतन मागील २२ वर्षे पक्षीनिरिक्षण करीत आहेत तसेच मागील ६ वर्ष वाइल्डलाईफ फोटोग्राफी करीत आहेत. या दरम्यान ते निसर्गाकडून जीवन शांत आणि आनंदी कसे जगावे हे शिकले आहे. निसर्गामधील अनेक आश्चर्यकारक घटना त्यांनी कॅमेरामद्धे टिपले आहेत. त्यांच्यासाठी निसर्ग हा त्यांचं गुरु असून त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. याचमुळे प्रत्येक माणसाने निसर्गाशी नाते जुळवावे आणि स्वतःचे जीवन आनंदमयी आणि शांतिमय जगावे.

छायाचित्रकारकडे निसर्गातील क्षण कायमस्वरूपी टिपण्याची किमया आहे. छायाचित्रिकरण आणि पक्षीनिरीक्षण ये छंद निसर्गाशी नाते जुळवण्यास सुकर आहेत. डॉ. मेतन यांना नॅशनल जिओग्राफीचे सदसत्व प्राप्त झाले आहे. त्यांची वन्यजीव छायाचित्रे श्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पक्षीकोशमद्धे प्रसिद्ध झाले आहे. त्यांना कर्नाटक जंगल रेसॉर्टचे लॉयल्टी मेंबरशिप मिळाली आहे. मागील महिन्यात त्यांचे छायाचित्र मुंबईमधील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रसिद्ध झाले आहे. येत्या काळात असे मोठे प्रदर्शन भारतभर करण्याचा डॉ. व्यंकटेश मेतन यांचा मानस आहे.

डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या निसर्ग आणि वन्यजीव यांच्या छायाचित्राचे “निसर्गाशी नाती जुळवा” हे प्रदर्शन बंगलोर येथील प्रतिष्ठित चित्रकला परिषद येथे ९ ते १२ ऑगस्ट २०१८ दरम्यान अत्यंत यशस्वीरित्या भरवण्यात आले. या प्रदर्शनात सोलापूरची प्रतिमा प्रभावीपणे उंचावाली गेली. असे डॉ. व्यंकटेश मेतन म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk

घाटकोपर बस बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

swarit

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk