HW Marathi
मुंबई

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी (८ मार्च) अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत स्वयंपुनर्विकास धोरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. एसआरएचे रखडलेले प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसआरए प्रकल्पांतील रखडलेल्या तब्बल १० लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

Related posts

प्रजा फाउंडेशन तर्फे आमदारांचे वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित

अपर्णा गोतपागर

चला…चला..बाहेर..या साहेब….आले!

अपर्णा गोतपागर

पेंग्विनमुळे राणीच्या बागेत पर्यटक वाढले

News Desk