HW News Marathi
मुंबई

LIVE Update | सीएए, एनआरसी विरुद्धच्या मोर्चाला मुंबईत सुरुवात

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात आज पर्यंत अनेक मोर्चे झाले. आज (१५ फेब्रुवारी) पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या असून ‘संविधान बचाव’चा नारा या मोर्चात घुमत आहे.

 

लाईव्ह अपडेट्स:

  • महाराष्ट्रात एनपीआर देखील लागू होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ती राज्य सरकारकडे मांडणार – अबू आझमी
  • स्वत:च्या पैशानं लोक आंदोलनाला येत आहेत. आपलं घर हिरावलं जातंय याची लोकांना भीती वाटतेय – अबू आझमी
  • दोन ठग लोकांना छळताहेत, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मोदी-शहांवर टीका
  • सीएए विरोधी मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग
  • आझाद मैदानात आंदोलक जमले
  • मुंबईतील सीएए, एनआरसीच्या या महामोर्चात ६५ संघटना सहभागी होणार, आयोजकांचा दावा
  • मुंबईसह आसपासच्या शहरांतून आंदोलक आझाद मैदानावर जमण्यास सुरुवात
  • राजकीय नेते व अभिनेतेही मोर्चात सहभागी होणार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Aprna

ठाकरे गटाच्या BMC कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; दोन्ही गटाचे नेते आमने-सामने

Aprna

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna