HW News Marathi
मुंबई

राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर

मुंबई | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या मुंबईत येणार आहेत. आरएसएस कार्यकर्त्यांने राहुल गांधींवर मानहाणीचा दावा केला होता. या याचिकेवर उद्या (१२जून) रोजी ११ वाजताच्या सुमारास सुनावणी होणार आहे. गांधी मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रथम भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत.

त्यानंतर गांधी गोरेगाव पूर्वमध्ये नेस्को ग्राउंडवरील हॉल नं.३ मध्ये दुपारी ३.३० वाजच्या सुमारास मुंबईतील बुथ स्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील. मुंबईतील एकूण १५ हजार बुथ कार्यक्रर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून हा पहिला बुथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्पना राहुल गांधी यांची असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती सांगितली आहे.

देशातली सर्व बुथ कार्यकर्त्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत. या मेळाव्या अंतर्गत गांधी उद्या स्वत: कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरा अभिनायनाला ‘शक्ती संकल्प‘ असे नाव देण्यात आले असून शक्ती संकल्प उद्या गांधी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे.

या मध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन प्रकार हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात राहुल गांधी यांचा व्हिडिओ रिलिज करण्यात येणारे आहे. तर या व्हिडिओत मोबाईल नंबर रिलिज करण्यात येणार असून या नंबरवरुन कार्यकर्त्यांनी त्यांचा वॉटर आयडि नंबर स्वत:च्या मोबाईलवरुन पाठवावा. या अभियाना अंतर्गत राहुल गांधी तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवनसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

News Desk

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk