HW News Marathi
मुंबई

पहिल्याच पावसात रेल्वेचा बोजवारा

मुंबई | मुंबई उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत मान्सूनपूर्व पावसान शनिवारी जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन महिन्यांत उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना पहिल्या पावसामुळे नक्कीच थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे शनिवारी सायंकाळी चाकरमान्यांची मात्र भलतीच तारंबळ झाल्याचे पहायला मिळाले. उपनगरातील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, गोवंडी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला.

सायंकाळी ऑफिसचे कामकाज उरकून निघत असलेल्या अनेकांना या पावसामुळे चांगलाच फटका बसला. अंधेरी रेल्वे स्थानकात रात्री सव्वा आठच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्टिक झाल्यामुळे बोरिवली ट्रेन बराच वेळ खोळंबली होती. शॉर्ट सर्टिकचा झालेला आवाज आणि धुरामुळे लोकांमध्ये काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यंदातरी रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा असलेल्या अनेकांचा यावेळी भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे लोकल काही वेळ उशीरा धावत होत्या. सायंकाळी घरी जायची घाई असताना लोकल उशिरा येत असल्यामुळे नागरीक रेल्वे प्रशासनावर राग व्यक्त करताना यावेळी पहायला मिळाले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांच्या पत्नी उज्ज्वला यांचं निधन

News Desk

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk