मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले असून ५ जवान जखमी झाले आहेत. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा येथे रेल रोको आंदोलन सुरू आहे. या रेले रोकोमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत जाली आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Several protesters have blocked the tracks at Nallasopara due to which train movement has been affected at Nallasopara & beyond. GRP, RPF are making efforts to convince the people & evacuate the tracks & normalize the train movement. @drmbct
— Western Railway (@WesternRly) February 16, 2019
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वेचा खोळंबा झाला असून पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. ऐन कामाच्या वेळेला रेले रोकोमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे कळत आहे.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण ७८ वाहने होती. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.