HW News Marathi
मुंबई

आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर

मुंबईउत्तर भारतीयांच्या नेहमी विरोधात असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आले होते. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारले असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी सांगितली आहे

हा कार्यक्रम २ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये होणार असून उत्तर भारतीय महापंचायतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

“मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक २ डिसेंबर २०१८ रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी शेअर केलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

News Desk

420 विनापरवाना व्यवसायांवर महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा

News Desk

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधा

News Desk