HW News Marathi
मुंबई

निवासी डॉक्‍टरांना थेट प्रशासनापुढे समस्या मांडता येणार

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पालिका निवासी डॉक्टर अनेक समस्यांनी हैराण आहेत. मात्र आता लवकरच या डॉक्टरांच्या समस्या दूर होणार आहेत. पालिका रुग्णालयाच्या दरमहा होणाऱ्या आढावा बैठकीत आता निवासी डॉक्‍टरांनाही सहभागी होता येणार आहे. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांना थेट रुग्णालय प्रशासनासमोर आपल्या अनेक समस्या मांडता येणार आहेत.

मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका आरोग्य सेवा देत आहे. पालिका रुग्णालयांमध्ये विविध विभागात कोणत्या समस्या आहेत, हे फक्त निवासी डॉक्‍टरांनाच माहित असते. मात्र त्यांच्या रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांना थेट प्रशासनापुढे मांडता येत नाहीत. डॉक्‍टरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात दर महिन्याच्या अखेरीस बैठक घेतली जाते. संबंधित अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. या बैठकीत रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाचे प्रमुख, अभियंता, परिचारिका प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. मात्र निवासी डॉक्‍टरांना या बैठकीत सहभागी होता येत नव्हते. पालिकेच्या मुख्य तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्यासह केईएम रुग्णालयात गेल्या मंगळवारी प्रतिनिधींची बैठक झाली.

सदर बैठकीत डॉक्‍टरांनी आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात निवासी डॉक्‍टरांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, यासाठी प्रत्येक महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बैठकीत त्यांना सहभागी करण्याचा निर्णय झाला. असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ज्या मागण्या पालिकेशी संबंधित आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत डॉक्‍टरांच्या मागणीनुसार पालिका रुग्णालयांत होणाऱ्या महिन्याच्या आढावा बैठकीत त्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता निवासी डॉक्‍टरांना आपल्या समस्या थेट प्रशासनापुढे मांडता येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk

आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

News Desk

दिव्यांगांकडून शिवसेनेला 20 दिवसांचा अल्टीमेटम

News Desk