HW News Marathi
मुंबई

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानभवनात निदर्शने

मुंंबई | भिमा कोरेगांव येथील हिंसाचार​ ​प्रकर​णी​​ मुख्य सुत्रधार असलेल्या ​मनोहर कुलकर्णी ऊर्फ ​संभाजी भिडें​ यां​ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ​या प्रकरणी ​क्लीनचीट दिली. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चीटच्या विरोधात आणि ​संभाजी ​भिडेला अटक क​रा.

या​मागणी​साठी​ राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड. जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, विद्याताई चव्हाण आणि पीआरपीचे​ प्रा.​ जोगेंद्र कवाडे यांनी विधान भवनाच्या आवारात आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलना​त राज्यातील​ शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस​ ​पक्षातील अनुसूचित जाती जमातीच्या ​मागासवर्गीय ​आमदारांनी​ या आंदोलना पासून​ स्वत:ला ​दूर​ ठेवले. ​भिमा कोरेगाव मधील​ ​हिंसाचार​ प्रकरणी संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप जवळपास सर्वच दलित​,आंबेडकरी,बहुजन​ संघटनांनी केला.

मात्र ​भिडे यांचा ​त्यामध्ये​ कोणताही सहभाग असल्याचा​,​ त्यांच्या सहभागाचे पुरावे मिळाले नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भिडेंना विधानसभेत क्लीन चीट दिली. विशेष म्हणजे सभागृहातील विरोधी बाकावरील एकाही सदस्याने​ मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर​प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या उत्तराचे पडसाद आज सर्व पक्षिय आमदारांमध्ये उमटण्याची शक्यता होती.

त्यातल्या त्यात काँग्रेसच्या ​मागासवर्गीय​ आमदार, रणजीत कांबळे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे तर शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे, डॉ.बालाजी किणीकर, भिमराव तापकीर,​ डॉ.मिनचेकर,​ मनसेचे शरद सोनावणे, भाजपचे चरण वाघमारे, राजेश क्षिरसागर, विजय गिरकर यांच्यासह अनेक दलित समाजातील आमदारांनी या​ आंदोलनाकडे पाठ फिरविली.​ ​मात्र यावेळी राष्टवादीचे अॅड. जयदेव गायकवाड.प्रकाश गजभिये,विद्याताई चव्हाण,आणि पीआरपीचे प्रा.जोगेंद्र कवाडे ​या चार आमदारांनी संभाजी भिडेला अटक ​झाली पाहिजे अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग

News Desk

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar