HW News Marathi
मुंबई

सतीश शेट्टी खून प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमची मागणी

मुंबई: आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी खूनाचा तपास संथगतीने सुरू असून या हत्या प्रकरणाची श्वेतपत्रिका शासन आणि सीबीआयने काढण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करत आजही आरटीआय कायद्यास अजून बळकट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

आझाद मैदानात आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमतर्फे आयोजित सतीश शेट्टीचे काय झाले? या निदर्शने प्रसंगी अनिल गलगली यांनी आरटीआय कायदा प्रत्येक सरकार आपआपल्या सोयीने कशा वापरतात याची उदाहरणे दिली. सतीश शेट्टी हत्या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली गेली तर सरकार आणि सीबीआयने केलेल्या तपासाची माहिती जनतेसमोर येईल.

माहितीचा अधिकार कायदाचे कलम 4 अन्वये देशातील प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कार्यान्वित केले तर माहिती अधिकार अजार्ची संख्या कमी होऊ शकते आणि सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते पण सरकार आणि बाबू मंडळी जाणूनबुजून त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गलगली यांनी केला.

शहीद सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास नसल्याची टीका करत खरे सूत्रधार आणि खूनी गजाआड पाठविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची घोषणा केली. कामगार नेते विश्वास उटगी यांनी या कायद्याच्या कक्षेत खाजगी आणि कापोर्रेट संस्थानास आणण्याची गरज असल्याचे सांगितले. फोरमचे अध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस 5 मागण्यांचे पत्र पाठवित मुख्य माहिती आयुक्त नेमणे तसेच निवृत्त न्यायाधीसांस प्राधान्य देण्याची मागणी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

swarit

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk
देश / विदेश

हिंदूत्व हाच मोदी सरकारचा खरा अजेंडा

News Desk

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्यावरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली.

सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरमय्या यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. भाजपाकडून सध्या सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत. योगी आदित्यनाथही अशाच मुद्द्यांवर बोलतात आणि अमित शहादेखील त्यांचीच री ओढतात. या नेत्यांकडे मांडण्यासाठी ठोस मुद्देच उरलेले दिसत नाहीत. पंतप्रधान मोदीनींही कदाचित तेच पालूपद लावले तर आश्चर्य वाटायला नको, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले.

Related posts

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk

दहशतवादाच्या मुद्यावर आता शांत बसणार नाही | पंतप्रधान मोदी

News Desk

भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या ‘त्या’ २० जवानांची नावे जाहीर

News Desk