HW News Marathi
मुंबई

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

मुंबई – संपुर्ण देशभरात शनिवारचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. सकाळी सांगली ६ पैलवानांचा मृत्यू झाला. त्यानंतर डहाणूत बोट बुडून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ओएनजीसीचे हेलिकॉप्टर क्रॅश यात ४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात सात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

  • सांगली अगघातात ६ पैलवानांचा मृत्यू

सांगलीमधील कडेगाव येथील वांगीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रुझर जीप या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ६ पैलवानांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडल्याची माहिती मिळली आहे. या जीपमध्ये ११ जण प्रवास करित होते.

  • ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा मृत्यू

ओएनजीसीच्या पाच प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश साईट झाल्याची माहिती मिळली. तटरक्षक दलाने शोध मोहिमेला सुरुवात केली असून दुसरीकडे नौदलाने काही बोटी आणि विमाने डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध सुरू केले होते. यात शोध मोहिमेत चार जणांचा मतृदेह सापडाल आहे.

  • डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

डाहणू समुद्रात बोट बुडाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या बोटीत एकूण ४० विद्यार्थी असून त्यापैकी ३२ जणांना वाचवण्यात यश आले असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या बोटीत के. एल पोंडा हायस्कूलचे एकूण ४० विद्यार्थी आहेत.

 

  • राजकोटच्या आगीत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजकोपच्या उपलेटमध्ये राष्ट्रकथा शिबिरात आग लागून तीन विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. तसेच या शिबिरात ५० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

  • जयपूरमध्ये सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

जयपूरमधील विद्याधरनगर भागात सिलेंडर स्फोट झाला असून यात एकाट कुटुंबातील पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाला. दोन सिलेंडरच्या स्फोटात घरातील सदस्यांचा जळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. पण, कुटुंबीयांना वाचवण्यात यश आले नाही.

  • कर्नाटकातील तलावात बस कोसळून ८ जणांचा मृत्यू

कनाटकमध्ये हासन तलावात प्रवाशांनी भरलेली KSRTCची बस कोसळून मोठा अपघात झाला. या आपघातात ८ जणांना जीव गमवावा लागला असून १५ जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

  • कर्नाटकात रिक्षा आदळून तिघांचा मृत्यू

कर्नाटकात रिक्षा झाडावर आदळल्यामुळे तीन जण जागीच मृत्यूमुखी पडले असून चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे. देवदर्शनाहून परतताना हा अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

News Desk

मुंबई मेट्रोचा मासिक पास महागला

News Desk

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit