HW News Marathi
मुंबई

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी सावरकरभक्तांचे उपोषण

मुंबई | स्वातंत्रवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ २०१६ पासून केलेल्या मागण्यांची अद्याप पुर्तता झालेली नाही. या मागण्यांची सरकारकडून पुर्तता व्हावी. तसेच विसर पडलेल्या मागण्या सरकारच्या लक्षात आणुन देण्यासाठी सोमवार दिनांक २८ मे २०१८ स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क मुंबई येथे एक दिवसीय उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

या उपोषणात राष्ट्राभिमानी समिती व ज्ञानदा प्रबोधन संस्थेचे प्रशांत पळ, संतोष नारायणे, दिलीप शिरसाट,अजय पोतदार,भरत राऊत,लालमनी उपाध्याय, विलास फडके, संतोष खंदारे, नितीन कदम आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. महत्वाचे म्हणजे भूतान येथे झालेल्या कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत मिळालेली पदके महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावरकर स्मारकात समर्पित केली आहेत. हे उपोषण सोमवारी सकाळी १० वाजता सुरु झाले असून ४ वाजेपर्यंत सुरु रहाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

swarit

मंत्रालयात कर्मचारी, अधिकारी यांना मास्कशिवाय प्रवेश नाही

News Desk

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk