HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई । स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतिस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार सर्वश्री गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मारकांच्या कामाची केली पाहणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी बुधवारी (१६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.

स्मारकाचे कामाचा पहिला टप्पा २०२३ पर्यंत पूर्ण होणार

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून मार्च २०२३ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल. बाळासाहेबांच्या स्मारकातून जनतेला प्रेरणा मिळणार असून त्यासाठी त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेचे असून ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला हे स्मारक समर्पीत करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या महापौर निवासस्थानाचे वारसा संर्वधन व जतन करणे, प्रवेशद्वार इमारतीचे बांधकाम, इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम इ. कामे प्रगतीपथावर आहेत. या स्मारकाच्या पहील्या टप्प्यातील ५८.३५ टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे, असे श्रीनिवास यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

Related posts

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

Aprna

ठाण्यात मिसळ महोत्सवाचेभव्य आयोजन

News Desk

उद्धव ठाकरें कोण म्हणाल उद्धट ?

News Desk