HW News Marathi
मुंबई

नोकरच निघाला चोर

मुंबई पोलिसांच्या तपासाला यश

धीरज घोलप

मुंबई – सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला हैदराबाद इथं एकानं गुंगीचं औषध देऊन सुमारे दोन कोटी रूपयांच्या मुद्देमालासह लुटल्याचा बनाव करणारा नोकरचं अखेर चोरटा निघालाय. परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्तांच्या टीमनं २१ दिवसांच्या अथक तपासानंतर ही चोरी उघडकीस आणलीय.

काळबादेवी येथील सोन्याचे व्यापारी जैन यांचा नोकर मनोहरसिंह जोधा हा ३० मे रोजी दुपारी हैदराबाद इथल्या व्यापाऱ्याकडून सुमारे साडेसात किलो वजनाचं दोन कोटी २४ लाख रूपयांचं सोनं घेऊन खासगी बसनं मुंबईला येत होता. अज्ञात व्यक्तीनं जोधा याला गुंगीचं औषध देऊन त्याच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला, कांदिवलीला आल्यानंतर दागिने गहाळ झाल्याचं लक्षात आल्याचं जोधानं मालकाला सांगितलं. त्यामुळं दुकानमालक जैन हे खात्री करून गुन्हा दाखल कऱण्याच्या तयारीत असतांनाच नोकर जोधा काळाचौकी इथून पळून गेल्याचं जैन यांच्या लक्षात आलं. त्यामुळं नोकर जोधा याच्याविरोधात जैन यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात जोधा आणि त्याच्या अज्ञात साथीदारांविरोधात तक्रार दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त (परिमंडळ १२) विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकं तयार कऱण्यात आली. हैदराबाद, मुंबई आणि राजस्थानमध्ये या पथकांनी तपास सुरू केला. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी जोधा आणि त्याचा साथीदार नारायणसिंह राठोड यांना चार किलो सोन्याच्या मुद्देमालासह बोरीवलीतून अटक करण्यात आली. एकूण ६.३ किलोग्रॅम सोनं चोरीला गेलं होतं, त्यापैकी ४ किलो सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय.

सहायक पोलिस आयुक्त सुभाष वेळे, वरिष्ठ पो.नि. दिलीप यादव, पो.नि. नितीन तडाखे, पो.नि. नामदेव वाघमारे, स.पो.नि. मानसिंह पाटील, सपोनि. नितीन आंधळे, सपोनि. संजय पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी हा तपास केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोलपंपावरील बेकायदेशीर छापे न थांबल्यास बेमुदत संपाचा इशारा

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

swarit

खूशखबर ! मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द

News Desk