HW News Marathi
मुंबई

शमिता शेट्टीचा जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात

मुंबई | जेष्ठ नागरिक अन्याय प्रतिबंधक दिवस म्हणून १४ जून ला मुंबईतल्या कित्येक वृद्ध आजी आजोबांना एकत्र करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलावण्याचे कार्य ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेद्वारे करण्यात आले होते. ४० वर्षांची परंपरा असलेली ‘हेल्पेज इंडिया’ हि संस्था या सर्व वृद्धांसाठी काम करते आहे.

वृद्धांना एकत्र आणून त्यांच्या घरी आणि इतर ठिकाणी त्यांना होणारे त्रास, आणि तक्रारी या सगळ्या गोष्टी खुल्यामनाने सर्वांसमोर मांडण्यात आल्या यामध्ये कित्येक वृद्ध आजी-आजोबांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची छोटी बहीण शमिता शेट्टी हिने या संस्थेच्या माध्यमातून या सर्व वृद्धांपर्यंत पोहचून मदतीसाठी हात पुढे केलेला आहे. तर पेशाने वकील असलेले प्रकाश बोरवणकर हे सुद्धा यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. यावेळी ७० वर्षांच्या गिरगावात राहणाऱ्या लिलाबाई माने सांगतात “माझं हक्काच घर असूनही मला माझ्याच घरात परक्याप्रमाणे राहावे लागते. मला माझ्या घरात हक्काची खोली हवी आहे आणि त्यासाठी मी कोर्टात सुद्धा लढत आहे.

सकाळी लवकर उठून घरातून बाहेर जाते संध्याकाळी ७ वाजता घरी आल्यावर सुद्धा मला बाहेर झोपावे लागते. कारभार हातात आला की मुले इतकी बदलतात हे मला जाणवत आहे. मला आता न्याय हवाय… असे लिलाबाई यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

रामनाथ मोते यांना शिक्षक, मुख्याध्यापकांचा पाठिंबा

News Desk

भरधाव दुचाकी टेम्पोला धडकून तीन तरुण ठार

News Desk