HW News Marathi
मुंबई

शेटे परिवारांची अनोखी घटस्थापना

ठाणे नवरात्री म्हटलं की जसा गरबा आपल्या डोळ्यासमोर येतो तसाच कुलदैवतांची घटस्थापना देखील आपल्या समोर येते. नवरात्रीच्या दरम्यान अनेकांच्या घरी कुलदेवतेची स्थापना होते ,त्यांची घटस्थापना होते मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा परिवाराची ओळख करून देणार आहोत की त्यांच्या घरी आगळीवेगळी घटस्थापना होते त्यांच्याकडे होते नात्यांची घटस्थापना.

ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारा हा आहे शेटे परिवार या परिवाराची खासियत ही आहे की आजही हा परिवार एकत्र आहे. यांचे कुळदेवही एकच आहेत. खापर पणजोबा,पणजोबा, आजोबा आणि यांच्यापासूनच सुरु असलेली ही पद्धत यांच्या नव्या पिढीने आजही मोठ्या आनंदानं जपलेली आहे.

कुटुंबाचा विस्तार फार मोठा झालाय , मात्र तरीही नवरात्रीमध्ये परिवारातले सगळे सदस्य एकत्र येतात आणि म्हणूनच यांच्याकडे एक घटस्थापनेची वेगळी पद्धत आहे. प्रत्येक वर्षी कुटुंबातल्या एका सदस्याकडे कुळदेवतांची स्थापना केली जाते आणि ज्यांच्या घरी कुळदैवतांची स्थापना केली जाते त्यांच्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी म्हणजेच फुलोऱ्याच्या दिवशी संपूर्ण परिवारातले सदस्य एकत्र येतात.संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंब असल्यामुळे जवळपास सतरा वर्षांनी प्रत्येकाला परिवारला कुलदेवतेची सेवा करण्याची संधी मिळते. बदलापूर मधले प्रसिद्ध उद्योजक आणि या परिवारातले ज्येष्ठ सदस्य असलेल्या पामर शेटे यांच्या घरी गेल्या वर्षी कुलदेवतेची स्थापना झाली होती यावर्षी हे देव याच परिवारातल्या बाळा शेटे यांच्या घरी स्थापन होणार आहेत. अनोख्या पद्धतीनं पामर शेटे आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी कुलदेवतांना साश्रूनयनांनी निरोप दिला. एका डोळ्यात हासू आणि दुसऱ्या डोळ्यात आश्रु अवस्था परिवारातल्या सदस्यांची झाली होती.परिवाराच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलदेवतांना निरोप देताना प्रथमच त्यांची छोटेखानी दिंडी काढण्यात आली. कुटुंबातल्या एका परीवराकडून दुसऱ्या परिवाराकडे कुलदैवत घेऊन जाण्यासाठी परिवारातील सर्व सदस्य एकवटले होते आणि वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात या कुलदेवतांना निरोप देण्‍यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीमाणिकप्रभूंच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम- आनंदराज प्रभू

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉग

News Desk

अवघ्या चार मिनिटांत २२ जणांचा बळी

News Desk