HW News Marathi
मुंबई

येत्या २६ जुलैला मुंबईत जोरदार पाऊस पडणार | स्कायमेट

मुंबई । गेल्या काही दिवसात पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र, २६ जुलैला मुंबईत अतिवृष्टी इशारा स्कायमेटने वर्तविला आहे. २६ जुलैला कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी अंदाजही वर्तविली जात आहे. त्याचबरोबर २७ आणि २८ जुलै रोजीही मुंबईत जोरदार पाऊसाचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे.

तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसेल. तर विदर्भ व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस वाढेल. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या पावसाची यंदा पुनरावृत्ती होण्याची भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

News Desk

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit
देश / विदेश

‘त्या’ विधानानंतर प्रज्ञा ठाकूर यांना पक्षाने बजावली नोटीस

News Desk

नवी दिल्ली | वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले होते. “मी गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेले नाही,” असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते. दरम्यान, या विधानामुळे आता प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना नोटीस पाठवली आहे. तसेच प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर पक्षनेतृत्त्व नाराज असल्याचे देखील जेपी नड्डा यांनी ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतर त्यावर उत्तर देताना प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, “मी गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेली नाही. ज्यासाठी मला खासदार म्हणून जनतेने निवडून दिले आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू.” प्रज्ञा सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाने त्यांच्या या विधानाची गंभीर दखल घेत त्यांना दिल्लीतील मुख्यालयात देखील बोलावून घेतले होते.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या त्या विधानातून अप्रत्यक्षपणे भाजपसह पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेवर केलेल्या टीकेमुळे त्यांना पक्ष नेतृत्त्वाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. म्हणूनच “पक्षाच्या मोहिमा, योजना आणि विचारधारा यांच्या परस्परविरोधी कोणतीही विधाने करू नका”, अशा स्पष्ट सूचना प्रज्ञा ठाकूर यांना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

Related posts

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk

मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

Aprna

निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प

swarit