HW News Marathi
मुंबई

वाशीत लोकलच्या पेंटाग्राफमधून धूर, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नवी मुंबई | हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफने पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडे धूर पसरला. त्यामुळे रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर ही गाडी कारशेडच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरळीत असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

News Desk

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

Aprna

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk