HW News Marathi
मुंबई

राज्यात लठ्ठपणाविरोधात मोहीम चालवणार, मुख्यमंत्र्यांची घोषण

पुणे- लठ्ठपणाची वाढती समस्या पाहता राज्यात लवकरच लठ्ठपणाविरोधात मोहीम सुरु केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. पुण्यातील रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित “बालपणी जडणाऱ्या स्थूलपणाविरोधातील चळवळी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मी लहानपणापासुनच लठ्ठपणाचे उत्तम उदाहरण आहे. वाढत्या वजनाचे फायदे- तोटे मला माहित आहे. लहानपणी वजन वाढत असल्याचे सांगणारे कोणी नव्हते. मात्र आजच्या पिढीला शरिर सुदृढ पद्धतीने घडविण्याचे संस्कार देण्याची गरज आहे असे या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

बदलत्या अयोग्य जीवन पद्धतीमुळे विविध आजार बळावत आहे. त्यातच आजच्या पिढीमध्ये लठ्ठपणाचा आजार मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. या विरोधात आरोग्य, शिक्षण, वैद्यकिय अशा विविध विभागांमध्ये समन्वय साधत लवकरच राज्यभर लठ्ठपणाविरोधात मोहीम चालवण्यात येणार आहे…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिव्यांग सेनेचा विविध मागण्यासाठी मेट्रोच्या कार्यालयावर धडक मोर्चा

News Desk

ऑगस्टमध्ये सुट्यांचा हंगाम

News Desk

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

News Desk