HW News Marathi
क्राइम मुंबई

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

मुंबई – कुणी पैसे चोरी करतं तर कुणी सोने-चांदी तर कुणी दुचाकी-चारचाकी. फार फार तर आपण मुले चोरणाऱ्या टोळीचे किस्से देखील ऐकले आहे. पण ट्रक चोरांबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? होय, चक्क मुंबईच्या गोवंडीमधील शंकरा कॉलनी परिसरातून भारत बेंझ कंपनीचा डम्पर चोरून अहमदाबादला घेऊन जात असणाऱ्या एका अंतरराज्य टोळीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. देवनार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकने गुजरातमधील वासद पोलिसांच्या मदतीने वासद टोल नाक्यावर सापळा रचून या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.

तर घडलं असं, बुधवारी संध्याकाळी मारू अली शेख यांनी त्यांचा भारत बेंझ कंपनीचा डम्पर गोवंडीमधील शंकरा कॉलनी परिसरातील मॅजेस्टिक बिल्डिंग समोर पार्क केला होता. चोरट्यांनी हा पार्क केलेला डंपर चोरी केला आणि गुजरातच्या दिशेने जाऊ लागले. डंपर चोरी झाल्याचे समजताच मारू शेख यांनी तात्काळ देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित भादंवि कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आणि तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे वर्गीकृत केला. तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने मुंबई बाहेर जाणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर दूरध्वनी द्वारे संपर्क केला. तेव्हा, महाराष्ट्र-गुजरात बॉर्डरवरील तलासरी चेक पोस्ट येथून पहाटेच्या सुमारास हा डंपर गुजरात राज्यात गेल्याचे समझले. डंपर बाबतची माहिती ही गुजरात राज्यातील महामार्ग लगत असणारे पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आली व त्वरित वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उप निरीक्षक समाधान सुपे आणि गुन्हे शाखेचे एक पथक तलासरीच्या दिशेने रवाना झाले.

ऑल इंडिया पोलीस ग्रुपच्या मदतीने कर्जन टोल नाक्यावरून दुपारी 12 च्या सुमारास हा डंपर पास झाला असल्याची माहिती मिळाली. तात्काळ आनंद जिल्ह्यात असलेल्या वासद पोलीस ठाण्याला याची माहिती देऊन त्यांच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वासद टोल नाक्यावर सापळा रचून चोरी झालेला डंपर ताब्यात घेण्याची विनंती केली. वासद पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक नगोळ व पथकाने सापळा रचून डंपर व 3 आरोपींना ताब्यात घेतले. चोरांना अटक करून पोलिसांनी हा गुन्हा तब्बल 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे. सुरजसिंग ठाकूर, सुनील कॉल आणि शहबाज झुल्फिकार खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून सध्या ते पोलीस रिमांडमध्ये आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांची तारांबळ करून, भाजपचे जोरदार प्रदर्शन

News Desk

मुखेडमध्ये अवैध धंद्यावर छापे १२ लाखांचा ऐवज जप्त

News Desk

“गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं”-छगन भुजबळ

News Desk