HW News Marathi
मुंबई

शिक्षकांवर विद्यार्थ्याने केला कोयत्यानी हल्ला

पुणे वाघोली परिसरात एका विद्यार्थ्यांने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यी फरार झाला असून पोलिस गुन्हा दाखल केली आहे.

सुनिल पोपट भोर अकरावीत शिकत असून या विद्यार्थ्याला धनंजय आबनावे आणि दर्शन चौधरी शिक्षकांनी खडसावले होते. डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती. यावेळी त्यांनी भर वर्गात सुनीलची खरडपट्टी काढली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते. त्यावेळी सुनीलने त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले. दोघेही जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk

न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का – अॅड. उज्ज्वल निकम

News Desk

आज मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk