मुंबई | कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले असून एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्हीही टीबीएम्स मशीन बाहेर पडल्या आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाची गती वाढली असून यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आज दादर येथील शिवसेनाभवन पर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे.
कृष्णा १ आणि कृष्णा २ या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लौंचिंग शाफ्ट माहीम येथून अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १८ ऑक्टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर माहिम पासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर २४९० मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा १ या टीबीएमसाठी १७७९ इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा २ या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी २४७२ मीटर भुयारीकरणासाठी १७६६ इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा १ व कृष्णा २ द्वारे सरासरी दररोज १० ते १२ मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.
जुळ्या बोगद्यातून एकाच दिवशी बाहेर पडणारी टीबीएम्स ठरली विशेष आकर्षण कुलाबा-वांद्रे-सीप्झ #metro ३ मार्ग
नया नगर ते दादर पर्यंतचे भुयारीकरण पूर्ण pic.twitter.com/SmHkM9lUrI— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 31, 2019
या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या १०० जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठलाय. कृष्णा १ आणि २ हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे व त्याची लांबी १०८ मीटर इतकी असून हे प्रत्येकी ४०० टन इतक्या वजनाचे आहे.
याप्रसंगी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या,”आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व १७ टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि १८ किमी पेक्षा अधिक म्हणजेच एकूण ३५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी दिलेल्या वेळेत आम्ही मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्वास आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.