HW News Marathi
मुंबई

कफ परेड येथे खारफुटीच्या झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

मुंबई | कफ परेड येथील गणेशनगर परिसरात असलेल्या कांदळवनातील खारफुटीच्या झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विकास कांगळे (३०) असे होते. अद्याप या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

विकास हा कफ परेड येथील गणेश मूर्ती नगरमध्ये राहत होता. शुक्रवारी दुपारी तो खाडीजवळील कांदळवनात गेला होता. यावेळी त्याने खारफुटीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजता हा प्रकार एका नागरिकाच्या लक्षात येताच त्याने कफ परेड पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. विकासच्या आत्महत्येमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनील रामानंद यांची बदली रद्द

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासावर हायकोर्ट नाराज

swarit

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk