HW Marathi
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून गुरुवारी (१४ मार्च) झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदार असलेल्या आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

Related posts

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चाला माओवाद विचारसरणी डोकावत आहे | पूनम महाजन

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी विशेष पॉवर ब्लॉक

News Desk