HW News Marathi
मुंबई

एसटी आगारातून खाजगी वाहतूकीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करा

मुंबई – आपल्या विवीध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप केला होता. त्या संप करणाऱ्या कर्चमाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कट करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याचे पडसाद एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उमटले असून एसटी कर्मचारी संघटना पून्हा एकदा आक्रमक झाली आहे. संपकाळात एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाल्याचे महामंडळाने सांगितले आहे. त्यामुळे ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी न्यायालयाचे नियम ही पुढे केले जात आहेत. मात्र न्यायालयाच्या नियमानुसार एसटी आगारात खासगी वाहतूक सुरु करता येत नाही, असं असतानाही महामंडळानं खासगी वाहतुकीला परवानगी कशी दिली, असा सवाल एसटी कर्मचारी संघटनेनं केला आहे.

कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे अशी परवानगी देणाऱ्या परिवहन मंत्री आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशारा इंटकतर्फे देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk

पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

News Desk