झणझणीत आणि चटकदारमिसळींचे ७० पे
ठाणे: ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढीलआठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्याआणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशाचटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातीलखाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीसउतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्यासंकल्पनेतून साकारलेल्या मिसळमहोत्सवाचे आयोजन आता ठाण्यातकरण्यात येत आहे.
ठाण्यातील स्थानिकनगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नानेठाण्यातील घंटाळी देवी मंदीराजवळीलघंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजनकरण्यात आले असून तीनही दिवससकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हामहोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर,पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली,ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्धअसणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदारआणि झणझणीत मिसळींसह यामहोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळया महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्धअसणार आहेत.
याशिवाय दही, ताक,चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस,मोदक, खरवस, पुरणपोळी, कुल्फी,फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स यामहोत्सवात खवैय्यांची रसना तृप्तकरण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्र असलेलाभला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंटया महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.त्यामुळे तरूणाईची पावलेही यामहोत्सवाकडे वळणार यात शंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनहीमिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती.पुण्याप्रमाणेच ठाण्यातही खवय्यांचीसंख्या मोठी असल्याने ठाण्यातही यामहोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असाआयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक यामहोत्सवाला भेट देतील असा,आयोजकांचा अंदाज आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.