ठाणे | ठाण्यामध्ये ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया परिसरात सेफ्टीक टँक स्वच्छ करताना ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर इतर ५ जणांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अमित पहाल (वय २०), अमन बादल(२१) आणि अजय बुंबाक (२४) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहे.
Thane West: 8 people got stuck in a 130 cubic meter deep Sewage Treatment Plant at Pride Presidency Luxuria in Dhokali around 12:25 am today. 3 of them died in the incident, rest 5 were rescued. Bodies handed over to police. #Maharashtra pic.twitter.com/XqzFGKw3cb
— ANI (@ANI) May 10, 2019
असून ही घटना ढोकाळी परिसरात रात्री १२.३०च्या सुमारास घडली. तर विरेंद्र हतवाल(२५), मनजित वैद्य(२५), जसबीर पुहाल(२४), रुमेर पुहाल(३०) आणि अजय पुहाल(२१) या पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. सेफ्टीक टँक स्वच्छ करण्यासाठी आठ कामगार टँकमध्ये उतरले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन अधिकारी, पोलीस अधिकारी, १ फायर वाहन, १ रेस्क्यू वाहन, २ रुग्णवाहिका दाखल झाल्या. यावेळी पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. मात्र तोवर तिघांचा मृत्यू झाला होता.
Maharashtra: 3 dead and 5 admitted to hospital after getting stuck in a sewage treatment plant in Dhokali, Thane.
— ANI (@ANI) May 9, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.