HW Marathi
मुंबई

महाशिवरात्री निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण

मुंबई | देशभरात महाशिवरात्री निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळात आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी दिनी हा सण साजरा केला जातो. मुंबईतही महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळाला. महाराष्ट्रातील नाशिक येथील प्राचीन  त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पहायाला मिळात आहे.

मुंबईजवळीत अंबरनाथ येथे प्राचीन उंच शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी १२ वाजतापासून मोठी गर्दी केली आहे. इथल्या टेकडीवर बाभळीचे झाड होते आणि त्यावरून बाबूलनाथ असे नाव पडले.अंबरनाथ शहरातील ९५८ वर्ष अशा अतिप्राचीन शिवमंदिरातही मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी जत्रा भरते. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुम्बानी याने ९५८ वर्षा पूर्वी बांधल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे युनोस्कोने जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. मध्यरात्री १२ वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

आज देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणांना भेट देतात. तर उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील अखेरचे शाही स्नान आज महाशिवरात्रीदिनीच होणार आहे.

Related posts

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

News Desk

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

हजारों कोटींची जमीन खाजगी कंपनीला दिली फक्त 54 कोटीत, काँग्रेसच्या मंत्र्यांचा प्रताप  

News Desk