HW News Marathi
मुंबई

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

पुणे | अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. ‘बंदमुळे जो भडका उडाला आहे, त्याला सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार’ असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे.

सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे. देशात सीरिया सारखे वातावरण निर्माण होत आहेत. देशात आजही अनेक ठिकाणी हिंसाचार यासर्व घटनेला सुप्रीम कोर्टला जबाबदार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच सोशल मीडीयावर भारत बंदची हाक दिली गेली, बंद कोणी पुकारला हे माहीत नाही. पण, लोकांमध्ये असणारा असंतोष यातून बाहेर येत आहे. आधी राजकीय पार्टी दलितांच्या भावनांशी खेळ खेळतच्या आता सुप्रीम कोर्ट हा खेळ खेळत आहे. या सर्व उद्रेकातून लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भंयकर होतील. भारत बंदातून जो भडका उडाला आहे, त्याला शासनच जबाबदार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भारत बंदमुळे मध्य प्रदेशमधील मुरैना येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैना भागात जमाव बंदी लागू (कलम १४४) करण्यात आली होती. या भारत बंदला पंजाब आणि राजस्थानमध्ये हिंसक वळण लागले. या राज्यातील पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री भेटीसाठी उद्धव ठाकरे अडीच तास ताटकळले

swarit

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

News Desk

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

swarit