HW News Marathi
मुंबई

शिवसेनेच्या शाखा प्रमुखाची दादागिरी

मुंबई | शिवसेनेचा शाखा प्रमुखाने केबल आणि इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रदीप मारुती धावले (२७) असे या व्यक्तीचे नाव असून श्री ओम साई सॅटेलाईट अँन्ड इंटरनेट सर्व्हिस येथे नोकरी करत आहे.कांजीचाळ, गंगा निवास, मनराज बिल्डिंगया परिसरात केबल व इंटरनेटचा व्यवसाय करत आहे. ‘तुला या परिसरात जर काम करायचे असे तर मला प्रत्येक पॉईटमागे शंभर रुपये द्यावे, नाही तर या परिसरामध्ये मी तुला व्यवसाय करुन देणार नाही.’गेल्या काही दिवसांपासून प्रदीप यांना सेनेचे शाखा प्रमुख जितेंद्र आणेराव त्याला धमकी देते होते.

गंगा निवास बिल्डिंगमध्ये एका ग्राहकाची तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदीप स्व:ता इंटरनेट पाहण्यासाठी गेला. पण, ही कनेक्शनची वायर कोणीतरी कापलेली होती. ही वायर व्यवस्थित करण्याचे काम केल्यानंतर गेटमधून बाहेर पडताच आणेराव यांनी त्यांच्या बिल्डिंगमधून गेटजवळ अडविण्यात आले. आठ ते दहा इसमांनी मला बेदम मारहाण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रदीपने ग्राहकांकडून जमा केलेले पैसे शर्टच्या खिशात पैसे ठवले होते. त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सोन्याची पेंडट देखील चोरण्यात आले. जितेंद्र आणेराव यांच्या विरोधात कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

News Desk

नीरव मोदींच्या मालमत्तांवर ईडीचे छापे,5,100 कोटींचे हिरे जप्त !

swarit

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk