HW News Marathi
मुंबई

दाऊदच्या टोळीतील गँगस्टर ‘महाडिक’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्या टोळीतील गँगस्टर मोहम्मद अहमदखान महाडिक (५५) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी(२४) मुंब्रा येथून अटक करण्यात आले आहे. मोहम्मद महाडिक याने १९९१ मध्ये हैदर या गुंडाचा खून केला होता. त्यानंतर, त्याला अटक करण्यात आली होती. परंतु १९९७ नंतर त्याला जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

मोहम्मद हा दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा नातेवाईक असून तो १६ वर्षांपासून आखाती देशात राहात असल्यामुळे तो दाऊदच्या संपर्कात होता का याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली आहे. मुंब्रा येथील कौसा भागात एक कुख्यात गुंड राहात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समीर अहिरराव यांच्या पथकाने सापळा रचून मोहम्मद यास सोमवारी अटक केली.

मोहम्मद हा गेल्या दीड वर्षांपासून मुंब्र्यात नाव बदलून राहात होता. तसेच कर्नाटकमध्ये पठान युसून उस्मान या नावाने त्याने न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी तो बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आखाती देशात पळून गेला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. मोहम्मद हा कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड असून त्याच्यावर खंडणी, खून, दुखापत, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

News Desk

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

आज मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk