HW News Marathi
मुंबई

स्थानिकांच्या सहकार्यातून ए.पी मंडई अद्यवायत करण्याचा विचार | रविंद्र वायकर

मुंबई | धोबीतलाव येथील ए.पी मंडईच्या पुनर्विकासाप्रकरणी स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास चांगल्या दर्जाची अद्ययावत मंडई उभारणे शक्य असून या ठिकाणी तळमजला मंडई आणि पहील्या मजल्यावर पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईत सध्या पार्कींग प्रश्न जटील बनत असून मुंबईतील पार्किंगप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवून ज्या ठिकाणी पार्कींग उभारणे शक्य आहे त्या ठिकाणी राज्य सरकार कडून उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. मंडईच्या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्याचा विचार असल्याचे मत गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केले

 

 

 

 

 

 

 

 

धोबीतलाव येथील आदमजी पिरभाई मंडईची जागा महादेवराव सिंधिया यांच्या मालकीची होती. ४ लाख ६९ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत राहील्याने ही जागा १९८२ मध्ये मुंबई महानगर पालिकेने अधिग्रहीत करुन म्हाडाच्या सहाय्यामे “पंतप्रधान अनुदान प्रकल्प” योजनेतून विकसीत केली होती. स्थानिक भाडेकरुंना कायमस्वरूपी जागा देवून उरलेली जागा म्हाडा व पालिकेने विभागनी करुन घेतली. या मंडईतील व्यापारी मराठीवर्ग असून गेली ४० वर्ष आपला व्यापार करत आहेत. मात्र सदरची मंडई धोकादायक स्थीतीत असल्याने मुंबई महानगरपालिकेने येथील गाळाधारकांचे विज व पाणी तोडून व्यापा-यांना हलवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मंडईच्या पुनर्विकासाला विरोध नसून मंडईच्या बाहेरील मोकळ्या जागेत व्यापारी गाळे उपलब्ध करुन देण्याची मागणी व्यापा-यांनी केली आहे.

धोकादायक मंडई इमारत प्रकरणी शिवसेना विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ व किशोर राठोड यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची भेट घेत मंडईच्या इमारतीची पाहणी करण्याची विनंती केली होती. स्थानिकांच्या व्यथा लक्षात घेवून गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी ए.पी मंडईच्या धोकादायक इमारतीची पाहणी केली. घटनास्थळी व्यापा-यांसह सदनिकाधारकांची भेट घेत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सर्वांनी एकत्रीत येवून पुनर्विकासाचा विचार केला तर चांगला विकासक नेमुन अद्ययावत मंडई उभी करणे शक्य असल्याचे यावेळी वायकर यांनी आश्वासीत केले आहे. एपी मंडईतील व्यापारी ४० वर्षे मंडईत व्यापार करत असल्याने मंडईचे काम पुर्ण होईपर्यंत त्यांना ए.पी मंडईच्या बाहेर तात्पुरत्या शेड बांधून द्याव्या अशी मागणी येथील व्यापा-यांची आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिका जबाबदार | मुंबई हायकोर्ट

News Desk

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात येणार

swarit

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

News Desk