HW News Marathi
मुंबई

एल्फिन्स्टन पुलाचे उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचा रेल्वेतून प्रवास

मुंबई | लष्कराच्या मदतीने उभारण्यात आलेल्या एल्फिन्स्टन फूटओव्हर पुलाचे उद्घाने रेल्वेमंत्री पीयूष गोयल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. दरम्यान, एल्फिन्स्टन फूटओव्हर पुलाच्या उद्घटनाला कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी रेल्वेमंत्री गोयल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेतून प्रवास केला. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण आज करण्यात येत आहे. एल्फिन्स्टन दुर्घनेत चेंगराचेंगरीमुळे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन पाहणी दौ-यात रेल्वेमंत्री गोयल यांनी लष्करामार्फत ३ पादचारी पूल उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. लष्कराच्या बॉम्बे सॅपर्स या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचा पादचारी पूल आंबिवली येथे, तर करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारला आहे. विविध अडचणींमुळे केवळ आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले होते.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने आंबविली आणि करीरोड येथील लष्करी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोटरी क्लबचा “लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ कौतुकास्पद

News Desk

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk