HW News Marathi
मुंबई

परळ टर्मिनसचा मुर्हूत अखेर ठरला, ३ मार्चला होणार सुरुवात

मुंबई | एल्फिन्स्टन रोड २९ स्पटेंबर २०१७ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्याने गेली अनेक वर्षे रखडलेल्या परळ टर्मिनसला घटनेनंतर चालना मिळाली. दुर्घटनेनंतर परळ टर्मिनस करण्याची नागरिकांनी मागणी केली होती. या मागणीकडे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. या टर्मिनसचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या रविवारी ३ मार्च रोजी यांचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साधारण एक वर्षातच आधुनिक सोयीसुविधा असलेले परळ टर्मिनस बांधण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या नव्या परळ टर्मिनसमधून १६ अप आणि १६ डाऊन अशा एकूण ३२ लोकल ट्रेन परळमधून सोडण्याची येणार असल्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे. परळ लोकलमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरण्यांच्या जागी उभारलेल्या टॉवर आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमुळे महत्त्वाचे परळ रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच परळ रेल्वे स्थानकाच्या परिसरात कॅन्सरवर उपचार करणारे मोठे टाटा रुग्णालय, केईएम आणि वाडिया प्रसूतिगृह रुग्णालयांसारखी महत्त्वाची रुग्णालये असल्यामुळे या रेल्वे स्थानकात रुग्णासोबत कामाला जाणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते. तसेच दादरवरून पश्चिम रेल्वेला जाण्यापेक्षा परळवरून पादचारी पुलाने पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) स्थानक गाठून चर्चगेट तसेच विरार दिशेला जाण्याची संख्या मोठी आहे. पहिली परळ लोकल ३ मार्च रोजी सकाळी ८.३८ वाजता सुटणार असून शेवटची परळ लोकल रात्री ११.१५ वाजता सुटणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा! – सचिन सावंत

Aprna

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk

प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ ‘हँग’

News Desk