मुंबई | माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत महाराष्ट्र पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. यामध्ये नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आले आहेत. यावेळी माओवादी थिंक टँकच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडींमधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेले सर्वजण माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. या व्यक्तींचा माओवाद्यांशी संबंध असल्याची माहिती या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र पोलिसांचे अतिरीक्त महासंचालक परमवीर सिंह यांनी दिली आहे.
पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- संपूर्ण देशातून ९ जणांना अटक केल्याची माहिती.
- संपुर्ण कारवाईचे छायाचित्रण करण्यात आले आहे.
- कारवाई दरम्यान अनेक महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती.
- माओवादी संघटनांशी सर्वजण निगडीत असल्याची माहिती. माओवाद्यांसाठी काम करत असल्याची माहिती.
- छाप्यात सापडलेल्या मुद्देमालाची होणार फॉरेंसिक चाचणी.
- हे खूप मोठी शडयंत्र असल्याचे उघड.
- इमे, पत्र व्यवहार तसेच हाती आलेल्या अन्य साहित्यातून मोठा कट उघडकीस.
- कारवाई दरम्यान कंप्युटर जप्त करण्यात आलेले आहेत. या कंप्यूटरचे पासवर्ड देखील पोलिसांच्या तपासात हाती आले आहेत.
- कारवाई दरम्यान आढळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे देशभरात अटक सत्र.
- राजीव गांधींसारख्या घातपाताचा उल्लेख देखील यामध्ये आढळून आला आहे.
- ८ जानेवारीला या केस ची सुरुवात झाली असल्याचे उघडकीस.
- एल्गार परिषद झाली तेव्हा झाली होती सुरुवात.
- भाषण झाली तेव्हा गुन्हा दाखल केला होता, त्यावेळी या प्रकरणातील ५ आरोपी होते,
- छापे टाकले तेव्हा साहीत्य जमा केले होते.
- पंचनामा आणि व्हिडिओ ग्राफी देखील करण्यात आली आहे.
- अधिक तपास करत होतो तेव्हा यात अनेक लोक सहभागी आल्याचे समोर आले.
- यामध्ये अजून परीक्षण केल्यानंतर माहिती पोहचविण्यासाठी कुरिअर चा वापर देखील यामध्ये करण्यात आला आहे.
- पुरावे २३ ऑगस्टला कारवाई करण्यात आली. त्यावेळी ७ आरोपींची नावे देखील समोर आली होती.
- २९ तारीखेेला ७ वेगवेगळ्या ठिकाणाहून काही पुरावे जप्त केले होते.
- हजारो कागदपत्रे आमच्या जवळ आहेत ते पुरावे आहेत.
- तेलतुंबडेंच्या पत्रात आक्षेपार्ह मजकूर.
- सत्ताधा-यांविरोधात युद्ध करण्याच्या प्रयत्नात होते.
- देशात मोठी फळी उभारण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न सुरु होता यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी जंगलात देखील पाठविले जाणार होते.
- संपूर्ण देशात ९ ठिकाणी छापेमारी.
- देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सुरू होते
- अनेक पत्रांमध्ये १५ लाखांच्या अर्थिक व्यवहारांची माहिती
- भीमा-कोरेगाव भडकविण्यासाठी ५ लाख रुपयाची माहिती
Investigation revealed that a big controversy was being plotted by Maoist orgs.The accused were helping them to take their goals forward. A terrorist org was also involved.On 17 May,sections under Unlawful Activities(Prevention) Act were imposed: PB Singh, ADG, Maharashtra Police https://t.co/QnXVicjbm9
— ANI (@ANI) August 31, 2018
Case was registered on 8 Jan about an incident of 31 Dec 2017 where hate speeches were delivered.Sections were imposed for spreading hatred. Investigation was conducted.Almost all the accused were associated with Kabir Kala Manch: PB Singh, ADG, Maharashtra Police #BhimaKoregaon pic.twitter.com/G27Lg2HLTm
— ANI (@ANI) August 31, 2018
When we were confident that clear links have been established then only we moved to take action against these people, in different cities. Evidence clearly establishes their roles with Maoists: Param Bir Singh, ADG, Maharashtra Police #BhimaKoregaon pic.twitter.com/eZnI0xyEV1
— ANI (@ANI) August 31, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.