HW News Marathi
मुंबई

राज्य सरकार पोरकट, आणि पळपुटे |  विरोधकांची टीका

मुंबई | विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज कुठल्याही महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याविना दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करणे तसेच धनंजय मुंडे यांच्या कथित सीडीकांडवरून दोन्ही सभागृहात काही काळ गोंधळ झाला. त्यानंतर दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, जनतेच्या हिताच्या मुद्यांना बगल देण्यासाठी सत्ताधारी पळकुटी भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांनी केली. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू असून सभागृहाबाहेर जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

सोमवारी कामकाजाला सुरुवात गोंधळाने झाली. शिवसेनेने प्रशांत परिचारक यांच्या निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावरून घोषणाबाजी केली. त्याला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला. परंतु अर्धातासानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली. त्यामुळे विरोधक देखील गोंधळून गेले. प्रशांत परिचारक यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली. दरम्यान, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला.

सत्तेत राहून सत्ताधारी पक्षाच्या धोरणाला विरोध करण्याऐवजी शिवसेनेने सभागृहातून बाहेर पडावे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तर राज्य सरकारच्या जनतेच्या हिताच्या मुद्यांना बगल देण्यासाठी अनावश्यक मुद्दे उपस्थित करून सभागृहाचे कामकाज चालू देत नाही. त्याची भूमिका पोरकट आणि पळकुटेपणाची असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

मागील तीन दिवस सलग सुट्या असल्याने सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. त्यात सोमवारी कामकाज सुरू होताच अनावश्यक मुद्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्याने सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेत वावरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकाऱ्यास दंड

News Desk

सीएसएमटी जवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटना, ‘रेड सिग्नल’मुळे जीवितहानी टळली

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

News Desk
मुंबई

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk

मुंबई | भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्यावरून आज सभागृहात गोंधळ झाला. शिवसेनेने पोस्टरबाजी करून परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या विरोधकांमुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.

दरम्यान, जनतेच्या हिताचे मुद्दे सभागृहात मांडले जावू नये, यासाठी सभागृहात गोंधळ घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, विधान परिषदेत देखील यावरून गोंधळ झाला.चंद्रकांत पाटील यांनीही यावर आक्रमक भूमिका घेतली

Related posts

मुख्यमंत्री अडचणीत भीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य

Adil

युतीच्‍या चर्चेला आजपासून सुरूवात – मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार

News Desk

तरुणीला धावत्या लोकल ट्रेनमधून फेकलं

News Desk