HW News Marathi
मुंबई

बैलगाडा शर्यतीसाठी अभ्यासगट नेमला

मुंबई, मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने ही शर्यत सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा धावाधाव सुरु केली आहे. त्यासाठी बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा म्हणजेच बैल आणि घोडा यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी सरकारने अभ्यासगट नेमला आहे. या अभ्यासगटाला एक महिन्यात अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ७ मे २॰१४ मध्ये दिलेल्या अंतिम निकालात बैल हा घोड्यासारखा कार्यकौशल्य प्रदर्शित करणारा प्राणी नाही. तसेच बैलाची शरीर रचना विचारात घेता बैल हा प्राणी शर्यतीमध्ये धावण्यास सक्षम नाही, असे निरीक्षण नोंदवले होते. या निरीक्षणाच्या आधारे उच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर बैल आणि घोडा यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी सरकारने पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डा€. डी. एम. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला आहे. हा अभ्यासगट विविध जातीतील बैल आणि घोडे यांची शरीर रचना, धावण्याची क्षमता, ओढकाम करण्याची क्षमता, धावताना त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल आदींचा अभ्यास करून अहवाल सादर करेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

News Desk

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk

ठाण्यात सॅटिक पुलावर दोन बसची धडक

News Desk